जातेगाव खुर्दचा बदलणार चेहरा !
रोटरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष साहिल शहा यांचा पदग्रहणात संकल्प
पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टच्या अध्यक्षपदी साहिल शहा आणि सचिव पदी संध्या बोराणा यांचे निवड झाली. यावेळी त्यांनी जातेगाव खुर्दच्या विकास प्रकल्पाचा आराखडा थोडक्यात विशद केला. यामुळे जातेगावचा चेहरा बदलण्यास मदत होणार असून आता रोटरीच्या अर्थसहाय्याने येथे विकास पर्व सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे.
सन 2023 – 24 या वर्षासाठी रोटरीच्या नवीन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ गणेश सभागृह न्यू इंग्लिश स्कूल येथे संपन्न झाला. यावेळी शहा यांनी गरजू मुलांसाठी वह्या, व्हिलचेरचे वाटप केले. त्याचबरोबर पाणी वाचवा प्रकल्प अंतर्गत वॉटर रेडिएटर वाटपाबाबत देखील आपले संकल्प जाहीर केले. तसेच यावेळी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची घोषणा यावेळी त्यांनी केली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून 2024 – 25 चे प्रांतपाल शितल शहा, सहप्रांतपाल अनंत तिकोने, पूर्व प्रांतपाल मोहन पलेषा, 2025 – 26 चे प्रांतपाल संतोष मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान खजिनदार पदी नरेश लोहार यांची देखील निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज जगदाळे यांनी केले. शहा यांच्या नियुक्तीमुळे विकासाचे नवे पर्व सुरू होईल आणि रोटरी क्लब अधिकाधिक जनताभिमुख होईल असा विश्वास यावेळी रोटेरियन अभय जोशी यांनी व्यक्त केला आहे.