क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

BCCIची एक घोषणा! अन् ‘हे’ 20 खेळाडू वर्ल्ड कप 2023च्या स्पर्धेतून बाहेर..

Team India Asian Games : टीम इंडिया प्रथमच आशियाई क्रिडा 2023 मध्ये सहभागी होणार आहे. त्यासाठी 15 खेळाडूंचा संघ तयार करण्यात आला आहे तर 5 खेळाडू स्टँडबायवर ठेवण्यात आले आहेत. 23 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

या स्पर्धेची जबाबदारी युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. कर्णधार म्हणून संघाला दिशा देण्याचं काम ऋतुराज किती यशस्वीपणे पार पाडतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी बीसीसीआयच्या एका घोषणामुळे या 20 खेळाडूंच्या स्वप्नांवर पाणी फिरलं आहे.

त्याचे कारण म्हणजे, बीसीसीआयने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात ज्यांची नावे आहेत ते वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाहीत असं सबा करीम यांनी सांगितलं आहे. जो कोणी आशियाई स्पर्धेत खेळेल तो विश्वचषक संघाचा भाग होणार नाही कारण दोन्ही स्पर्धा एकाच वेळी खेळल्या जाणार आहेत. त्यामुळे आशियाई कपमध्ये भाग घेणाऱ्या 20 खेळाडूंचे स्वप्न भंगणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये