“पोटदुखीच्या उपचारासाठी डॉ. शिंदेंना आणलं”; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

नाशिक : (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray) मागील वर्षभरात आम्ही केलेल्या शासकीय कामांवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यांना चांगली कामे झालेली पचत नाहीत. म्हणून त्यांच्या पोटात दुखायला लागलंय. त्यामुळं त्यांची पोटदुखी घालवण्यासाठी आम्ही डॉ. एकनाथ शिदेंना आणलं आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “कधी कधी चांगलं काम केलं तरी लोकांच्या पोटात दुखतं, लोकांना लाभ दिला तरी लोकांच्या पोटात दुखतं, तरी काही लोक यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. मग शासन आपल्यादारी कशा करता? लोकं जमा करता कशा करता? अरे लोकांना लाभ मिळतो म्हणून लोक येतात. तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय?, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांना सवाल विचारला आहे.
आता चिंता करु नका कोणाच्याही पोटात दुखलं तरी त्या पोटदुखीवर औषध देण्याकरता डॉ. एकनाथ शिंदे आम्ही आणले आहेत. त्यांच्या पचनी पडलं नाही तरी अजितदादा आहेत. त्यामुळं आता सर्वांच्या पोटदुखीवर आपण उपचार करणार आहोत. सामान्य माणसाला त्याचा अधिकारही देणार आहोत, असंही फडणवीस यावेळी म