ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात मुसळधार; आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोडवर

मुंबई | Monsoon Updates – राज्यात मुसळधार पाऊस होत असून, कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ३४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसंच मुंबईमध्येही पावसाच्या धारा कोसळत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूकही ठप्प झाली. मध्य रेल्वेची वाहतूक डोंबिवलीपर्यंतच करण्यात येते आहे. सीएसटी स्टेशनवर लोकांची गर्दी झाली आहे.

मी सकाळपासून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य सचिव या सगळ्यांना सूचना दिल्या आहेत. पावसाचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ या सगळ्यांना अलर्ट करण्यात आले आहे. आवश्यकता भासेल तिथे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नागरिकांची गैरसोय, नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना आज (गुरुवार) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मी सकाळपासून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य सचिव या सगळ्यांना सूचना दिल्या आहेत. पावसाचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ या सगळ्यांना अलर्ट करण्यात आलं आहे.
— एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये