बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! ‘ताली’ वेब सीरिजचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

मुंबई | Taali Trailer – बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनची (Sushmita Sen) ‘ताली’ (Taali) ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजमुळे सुश्मिता सेन चांगलीच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा टिझर प्रदर्शित झाला होता. हा टिझर प्रेक्षकांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरला होता. तर आता या सीरिजचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
‘ताली’ ही वेब सीरिज 15 ऑगस्ट या दिवशी प्रदर्शित होणार आहे. तर आता या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सध्या तो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. तृतीय पंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ही सीरिज आहे. या सीरिजमध्ये गौरी सावंत यांच्या भूमिकेत सुश्मिता सेन दिसणार आहे.
आज प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरमध्ये गौरी सावंत यांचं बालपण ते आजपर्यंतचा संघर्षमयी प्रवास दाखवण्यात आला आहे. तर ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. या सीरिजचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे. तसंच ही सीरिज जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.