ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

युतीसाठी भाजपची ऑफर, पण?

मुंबई | भाजपने (BJP) आपल्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण भाजपसोबत आधीच एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) आहेत. त्यामुळे भाजपच्या ऑफरवर कोणताही निर्णय घेतला नाही, असा मोठा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे. भाजपची ऑफर पूर्णपणे फेटाळल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले नाही. त्यामुळे राज ठाकरे हे आगामी काळात भाजपशी युती करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

राज ठाकरे यांनी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी राज ठाकरे यांनी हे विधान केले आहे. मला भाजपची ऑफर आली आहे. युती करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला. पण मी कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही.

भाजपसोबत एकनाथ शिंदे आहेत. आता अजित पवारही आहेत. अजित पवार यांचे भाजप काय करणार आहे हे माहीत नाही. युतीचे नेमके गणित काय असेल याबाबतही काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे मी अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांच्या विधानामुळे पुन्हा महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये