ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“अरे का खोटं बोलताय, सहा दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी तुमची…”, राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला

पनवेल | Raj Thackeray – गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह पक्षातील काही आमदार सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. तर अजित पवार यांनी सरकारसोबत युती केल्यानंतर सांगितलं की, आम्ही राज्याचा विकास करण्यासाठी सत्तेत सहभागी झालो आहोत. त्यांच्या या वक्तव्यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, अजित पवारांना विचारलं सरकारमध्ये का आला आहात? त्यावर ते म्हणाले, महाराष्ट्राचा विकास करायला आलोय. अरे का खोट बोलताय, सहा दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी काढली ना तुमची. महाराष्ट्रात 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यानंतर हे सगळे टुणकन भाजपमध्ये आले. कारण अजित पवारांना छगन भुजबळांनी सांगितलं असणार, आत (तुरूंगामध्ये) काय असतं? त्यामुळे आपण भाजपसोबत जाऊ पण तिथे (तुरूंगात) नको, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

पुढे राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्ग आणि नाशिकच्या रस्त्यांच्या अवस्थेवरून सरकारवर हल्लाबोल केला. चंद्रयान चंद्रावर जाऊन काय उपयोग आहे तिथे जाऊन खड्डेच तर बघायचे आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रात सोडलं असतं तर खर्च वाचला असता, अशी टिपण्णीही राज ठाकरेंनी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये