भारत ऑस्ट्रेलियादरम्यान व्यापारी करार

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील आर्थिक संबंधांना चालना देण्यासाठी शनिवारी आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार ऑस्ट्रेलिया भारतामधून निर्यात होणार्या कापड (Textile), चामडे, दागिने आणि क्रीडा उत्पादनांसह ९५ पेक्षा अधिक वस्तूंना टॅक्समुक्त करणार आहे. या वस्तूंवर कोणताही टॅक्स आकारण्यात येणार नसल्याने भारताचा मोठा फायदा होणार आहे. वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि ऑस्ट्रेलियाचे व्यापार, पर्यटन, गुंतवणूकमंत्री डॅन तेहान यांनी एका ऑनलाईन कार्यक्रमादरम्यान हा करार केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसनही उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, हा भारत आणि ऑस्ट्रेलियासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. या कराराच्या माध्यमातून भारत आणि ऑस्ट्रेलियामधील व्यापाराला आणखी चालना मिळेल. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले की, आम्ही भारतासोबत करार केला, याचा आम्हाला आनंद वाटतो. हा करार भारतासोबत आमचे मैत्रीपूर्ण असलेले संबंध आणखी मजबूत करेल.