ताज्या बातम्यामनोरंजन

‘बिग बॉस’ फेम मनिषा रानी टोनी कक्करला करतेय डेट? अभिनेत्रीनं स्वत:च केला खुलासा; म्हणाली, “खूप कमी वेळात…”

मुंबई | Manisha Rani – ‘बिग बॉस OTT’चं (Bigg Boss OTT 2) दुसरं पर्व यंदा चांगलंच गाजलं. यावेळी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामध्ये अभिनेत्री मनीषा रानी (Manisha Rani) ही देखील बिग बॉसनंतर चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. या शोनं मनीषाला एंटरटेनमेंट क्वीनचा टॅग दिला आहे. तसंच ती या शोची सेकंड रनर अप ठरली आहे.

बिग बॉसनंतर आता मनीषा राणी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनीषाचं अनेक सेलिब्रिटींसोबत नाव जोडलं जात आहे. यामध्ये प्रसिद्ध सिंगर टोनी कक्कर (Tony Kakkar) आणि ती एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. बऱ्याचदा त्या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. तर आता या डेटींगच्या चर्चांवर मनीषानं स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.

मनीषानं सांगितलं की, टोनी कक्करसोबत माझी खुप कमी वेळात मैत्री झाली. तो खुप चांगला असून तो एक शांत आणि सभ्य स्वभावाचा माणूस आहे. टोनी कक्कर लोकांचा आदर करतो. बऱ्याच सेलिब्रिटींमध्ये खुप इगो असतो पण टोनीमध्ये नाहीये. तो माझ्या वडिलांना भेटला तेव्हा तो त्यांच्या पाया पडला होता. त्याचं हे वागणं मला खुप आवडलं. तसंच मनीषानं डेटींगच्या अफवा असल्याचं सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये