सावधान, कोरोना अजून संपलेला नाहीये; नवीन व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन, CDC आणि WHO कडून अलर्ट

Corona New Variant – तुम्ही विचार करत असाल की कोरोना पूर्णपणे संपलेला आहे, पण तसा विचार अजिबात करू नका. कारण, कोरोना अजून संपलेला नाहीये. आता कोरोनाचा नवीन व्हेरिएंट कहर माजवत आहे. कोरोना यावेळी BA.2.86 च्या स्वरूपात जन्माला आला आहे. या व्हेरिएंटला Pirola असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे याबाबत CDC आणि WHO नं अलर्ट दिला आहे.
अमेरिकेची रोग नियंत्रक एजन्सी (CDC) या नवीन व्हेरिएंटचा मागोवा घेत आहे. तसंच हा व्हेरिएंट अमेरिका, डेन्मार्क आणि इस्त्रायल या देशांमध्ये आढळून आला आहे. याबाबतची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) देखील दिली आहे. याबाबत WHO नं सांगितलं की, या नवीन व्हेरिएंटमध्ये वेगानं उत्परिवर्तन करण्याती क्षमता आहे. सध्या तीन प्रकारांचा मागोवा WHO घेत असून त्यावेळी 7 प्रकारांवर देखरेख ठेवण्यात आली आहे.
BA.2.86 हा नवीन व्हेरिएंट कोरोना व्हायरसचा नवीन वंश आहे. GISAID नुसार या व्हेरिएंटमध्ये 30 पेक्षा जास्त म्युटेशन आहे जे सध्या प्रसारित होत असलेल्या इतर प्रकारांपेक्षा जास्त आहे. याला WHO नं सर्वाधिक म्युटेशन असलेला व्हायरस मानला आहे.