इतरक्रीडाताज्या बातम्यामनोरंजन

बॉलिवूड उतरलंय मैदानात; खेळावर आधारित ‘हे’ चित्रपट ठरलेत सुपरहिट

दोन दशकांपूर्वीपर्यंत खेळांवर आधारित चित्रपटांचे प्रमाण नगण्यच होते. मात्र आता ती परिस्थिती नाही. यात क्रिकेटशिवाय इतर खेळांशी संबंधित कथानकांवर अनेक सिनेमे निघाले आणि चाललेही. त्यांचा हा छोटासा आढावा. याशिवाय, काही खेळाडूंच्या चरित्रकहाण्यांवरही चित्रपट आले आहेत.

हिंदी सिनेमाने मैदान गाजवले असे पूर्वी फार कमी वेळा दिसले. आता मात्र ती परिस्थिती नाही. आता बॉलिवूड मैदानात देखील उतरलं आहे. बॉलिवूडने क्रीडा प्रकारावर आधारित अनेक चित्रपट काढत बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. क्रीडा प्रकारावर आधारित चित्रपटांना प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसतात.

घूमर (Ghoomer) – सध्या ‘घूमर’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. घूमरमध्ये अभिषेक बच्चनने क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे तर सैयामी खेरने महिला क्रिकेटरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे कथानक महिला क्रिकेटरच्या आयुष्यावर आधारित आहे. तसंच या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.

image

चक दे इंडिया (Chak De India) – हॉकी संघाची कथा असलेला ‘चक दे इंडिया’ हा चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला आणि चांगलाच गाजला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. आजही प्रेक्षक तितक्याच आवडीनं हा चित्रपट पाहतात. या चित्रपटात शाहरूख खान मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाची टीम देखील मोठी होती. शाहरूख या चित्रपटात हॉकी कोच असतो जो हॉकी खेळाडूंत शिस्त, देशभक्ती, सांघिक एकतेची भावना रुजवून हॉकीचे प्रशिक्षण देतो. त्यांच्यातूनच तो त्यांना हॉकी वर्ल्ड कपचे विजेते देखील बनवतो.

image 1

सुल्तान (Sultan) – सलमान खानचा सुल्तान हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला आहे. २०१६ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. कुस्तीवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत अनुष्का शर्मा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटात ती महिला कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसली आहे.

image 2

दंगल (Dangal) – आमीर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. कुस्तीच्या मल्लांवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शविली होती. कुस्ती या पुरुषांच्या खेळात नाव कमावलेल्या आणि मैदान गाजवलेल्या मुलींचा संघर्ष मांडणारी कथा त्यात आहे. ‘धाकड’ या गाण्याप्रमाणेच या चित्रपटाची कथाही जबरदस्त आहे. कुस्तीमध्ये चॅम्पियन असलेल्या महावीरभाई फोगाट यांनी गीता आणि बबिता या मुलींना विपरित परिस्थितीतून चॅम्पियन केले यावर या चित्रपटाची कहाणी आधारित आहे.

image 3

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये