ताज्या बातम्यादेश - विदेश

भारताची सूर्याकडे झेप; आदित्य-L1 चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा | Aditya-L1 Mission – आज (2 सप्टेंबर) भारतानं सूर्याकडे झेप घेतली आहे. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी भारताच्या सूर्य मोहिमेचं प्रक्षेपण करण्यात आलं. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या सहाय्यानं आदित्य-L1 (Aditya L-1) यान सूर्याच्या दिशेनं झेपावलं आहे. त्यामुळे आता भारताला या मोहिमेद्वारे सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे.

आदित्य यान हे पाच टप्प्यांमध्ये सूर्याचा प्रवास करणार आहे. हे यान पीएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमातून पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहे. त्यानंतर ते पृथ्वीच्या कक्षेतच फिरणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर काढण्यात येईल आणि तिसऱ्या टप्प्यात त्याचा सूर्याच्या दिशेनं प्रवास सुरू होईल.

तर हे यान चौथ्या टप्प्यात लॅग्रेंज बिंदूच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहे. त्यानंतर पाचव्या टप्प्यात ते सूर्याचा अभ्यास करण्यास सुरूवात करेल. या सर्व प्रकियेस चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये