धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली? हेमा मालिनी यांनी स्वत: दिली माहिती; म्हणाल्या, “त्यांची प्रकृती…”

मुंबई | Dharmendra – बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) हे आजारी असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यामुळे सनी देओल (Sunny Deol) वडील धर्मेंद्र यांना अमेरिकेत उपचारासाठी घेवून गेल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. तर धर्मेंद्र यांचे चाहते त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत आहेत. अशातच आता धर्मेंद्र यांच्या पत्नी, अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी पतीच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती दिली आहे.
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना हेमा मालिनी यांनी सांगितलं की, धर्मेंद्र यांची प्रकृती एकदम स्थीर आहे. तसंच ते अमेरिकेला रूटीन आरोग्य तपासणीसाठी गेले आहेत. त्यामुळे काळजी कारण्याचं काहीही कारण नाही.”
मिळालेल्या माहितीनुसार, सनी देओल हे वडील धर्मेंद्र यांना उपचारासाठी दोन आठवडे अमेरिकेत घेवून गेले आहेत. याबाबतची माहिची समजताच सोशल मीडियावर धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसंच त्यांचे चाहते देखील त्यांच्याबाबत चिंता व्यक्त करत होते. पण आता हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत माहिती देत सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.