ताज्या बातम्यादेश - विदेश

IAS टीना डाबी यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन; जयपूरच्या रूग्णालयात दिला गोंडस मुलाला जन्म

IAS Tina Dabi | जैसलमेरच्या IAS अधिकारी टीना डाबी (Tina Dabi) यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. टीना डाबी यांनी जयपूरच्या रूग्णालयात गोंडस मुलाला जन्म दिला आहे. टीना डाबी आणि प्रदीप गवांडे हे दोघं आई-बाब झाले आहेत. या आनंदाच्या बातमीनंतर टीना डाबी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

टीना डाबी या 2015 च्या IAS बॅचच्या टॉपर आहेत. तसंच टीना या गरोदर राहिल्यानंतर त्यांनी राजस्थान सरकारकडे नॉन फिल्ड पोस्टींग द्यावी अशी मागणी केली होती. त्याचबरोबर त्या 5 जुलैला मातृत्वाच्या रजेवर गेल्या होत्या. तर आज टीना यांनी जयपूरच्या रूग्णालयात मुलाला जन्म दिला.

दरम्यान, टीना डाबी यांनी पाकिस्तानातून आलेल्या हिंदू निर्वासितांना जैसलरमेरमध्ये घरं बांधून दिली होती. तसंच त्यांनी जैसलरमेरमध्ये महिलांना शिक्षण मिळावं यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी महिलांविषयी ज्या कुप्रथा सुरू होत्या त्या बंद करण्यात हातभार लावला होता. सोबतच टीना सोशल मीडियावरही खूपच प्रसिद्ध आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये