शिंदे की ठाकरे, शिवसेना आणि चिन्ह कुणाचे होणार? घटनातज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
मुंबई | Shiv Sena Crisis – शिवसेना (Shiv Sena) नाव आणि पक्षाचं चिन्ह निवडणूक आयोगानं (Election Commission) शिंदे गटाला (Shinde Group) दिलं होतं. तर निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटानं (Thackeray Group) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेत याचिका दाखल केली होती. तर आज (18 सप्टेंबर) या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय सुप्रीम कोर्ट रद्द ठरवणार का? असा प्रश्न उपस्थि केला जात आहे. याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
यावेळी उल्हास बापट म्हणाले की, शिवसेना नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगानं शिंदे गटालं दिलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय खंडपीठानं दिलेल्या निर्णयात म्हटलं की, पक्ष कुणाचा आहे हे ठरवताना पक्षाची मूळ संघटना कोणची, पक्षाची घटना काय, विधानसभेत त्यांच्या सदस्यांचं बहुसंख्य काय आहे या गोष्टींचा विचार करावा लागतो. पण या गोष्टींबाबत विचार केला गेला नाही.
याबाबत सुप्रीम कोर्टानं काहीतरी निर्देश द्यायला हवेत. कारण अशा प्रकारे जेव्हा निवडणूक आयोग निर्णय देतं तेव्हा या गोष्टींचा विचार व्हायला हवा. तो नसेल झाला तर सर्वोच्च न्यायालय आत्ताचा निर्णय रद्द ठरवू शकतं, अशी शक्यता उल्हास बापट यांनी बोलून दाखवली आहे.