ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईसिटी अपडेट्स

अंधेरीत हिरा पन्ना मॉलला भीषण आग; अनेक लोक अडकल्याची भिती

मुंबई | Mumbai Fire News – अंधेरीमध्ये (Andheri) हिरा पन्ना मॉलला (Heera Panna Mall) भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. ओशिवरा परिसरातील हिरा पन्ना मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. तर या आगीत अनेक लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हिरा पन्ना मॉलला लागलेल्या आगीत अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर अनेक कमर्शियल गाळे आहेत. तर या गाळ्यांमध्ये काम करणारे कामगार आणि ऑफिस कर्मचारी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

मॉलला आग लागल्याची माहिची समजताच ताबडतोब मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच ओशिवरा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचले आहेत. तर सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असून मॉलमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मॉलला आग कशी लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये