“…मला सोडून राज्यातील इतर कारखान्यांना मदत”, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत

Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागानं कारवाई केली आहे. जीएसटी विभागानं कारवाई केल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर ही कारवाई का करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर या कारवाईबाबत बोलताना पंकजा मुंडेंनी खंत व्यक्त केली आहे.
या कारवाईबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, कारखान्याबाबत काहीही चुकीच्या पद्धतीनं झालेलं नाहीय बँकेकडून कर्ज घेऊन सर्व शेतकऱ्यांचे पैसे अदा केले आहेत. तसंच कारखान्याच्या मदतीसाठी मी केंद्राकडे मदत मागितली होती. पण मला सोडून राज्यातील इतर कारखान्यांना मदत देण्यात आली असल्याची खंत पंकजा मुंडेंनी व्यक्त केली.
मी माझ्या कारखान्यातून आणि राजकारणातून संघर्षातून मार्ग काढेन. तसंच काहीही चुकीच्या गोष्टी करणार नसून लोकांसाठी राजकारण करत राहणार. मी एक संघर्षकन्याच नाही तर एक सहनशीलता कन्या आहे. त्यामुळे यातून मी मार्ग काढणार, असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.