ताज्या बातम्यामनोरंजन

बॉलिवूडची क्वीन अडकणार लग्नबंधनात? अभिनेत्याचा ट्विट करत खुलासा

Kangana Ranaut | बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) ही काहीना काही कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. चित्रपटांसोबतच कंगना तिच्या रोखठोक वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. तर आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कंगना लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय. याबाबतचा दावा एका अभिनेत्यानं ट्विट करत केला आहे.

अभिनेता कमाल आर खान उर्फ केआरकेनं (KRK) कंगना रणौत संदर्भातलं एक ट्विट केलं आहे. त्यानं ट्विट करत म्हटलं आहे की, “ब्रेकिंग न्यूज..अभिनेत्री कंगना रणौत डिसेंबर 2023 मध्ये एका उद्योगपतीसोबत एंगेज्ड झाली आहे. तर एप्रिल 2024 मध्ये ती लग्न करणार आहे.”

केआरकेनं केलेल्या या ट्विटनंतर कंगनाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर आता कंगनाचा होणारा पती कोण आहे? याबबात सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. काही दिवसांपूर्वीच कंगना लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं. तर आता ती लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान, कंगनाचा ‘तेजस’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर ती ‘चंद्रमुखी 2’, ‘इमरजेंसी’ या चित्रपटांमध्येही झळकणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये