ताज्या बातम्यापुणे

पुण्यात मोठी दुर्घटना टळली! जे पी नड्डा आरतीला आले, अन् साने गुरुजी तरुण मंडळाचा मांडव पेटला

Pune Fire News : गणेशोत्सवासाठी पुण्यात छोट्या मोठ्या मंडळांनी भलेमोठे देखावे उभारले आहेत. यातच राजकीय नेतेमंडळी या मंडळांच्या भेटीगाठी घेत आहेत. असातच पुण्यात आज एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आरतीला आलेले असताना साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपाला आग लागल्याची घटना घडली होती.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आरतीसाठी साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपात आले होते. इथे महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या मंदिरात कळसाला आग लागली आणि मंडळ पदाधिकाऱ्यांची अन् प्रशासनाची एकच धावपळ उडाली.

आग लागल्याने नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले आहे. तितक्यात पाऊस सुरु झाल्याने मंडपाला लागलेली आग विझली अन् मोठी दुर्घटना टळली आहे. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये