ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईसिटी अपडेट्स

“सरकारला किती मुडदे पाडायचेत…”, मराठा आंदोलकाच्या आत्महत्येनंतर मनोज जरांगेंचा हल्लाबोल

मुंबई | Manoj Jarange Patil : आज (19 ऑक्टोबर) मुंबईतील (Mumbai) एक मराठा आंदोलकानं आत्महत्या (Maratha Protester Suicide) केली. सुनील कावळे असं या व्यक्तीचं नाव आहे. सुनील कावळे या मराठा आंदोलकाच्या आत्महत्येनंतर आता मराठा समाज आक्रमक होणार असल्याची शक्यता आहे. तसंच या घटनेतंर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तर याबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी भाष्य केलं असून त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सरकारवर निशाणा साधताना मनोज जरांगे म्हणाले की, आज सरकारमुळे बळी पडायला लागले आहेत. पण भावांनो आपल्याला आरक्षण मिळणार आहे. आपण खूप वर्ष दम धरला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस दम धरा. मी आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो की पोरं आत्महत्या करायला लागले तर आरक्षण घेऊन काय उपयोग? त्यामुळे तुम्ही दम धरा. हे सगळं पाप सरकारचं आहे.

सरकारला किती मुडदे पाडायचेत माहिती नाही. आता एक माणूस कमी झाला, याला सरकार जबाबदार आहे. त्यामुळे आता त्याचं तरी बलिदान वाया जाऊ देऊ नका. सरकारनं तातडीनं मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. नाहीतर सरकारला 24 तारखेनंतर होणारं आंदोलन परवडणार नाही, असा इशारा देखील मनोज जरांगेंनी दिला.

मराठा आंदोलकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे. जर सरकारनं आमच्या हक्काचा विषय ताबडतोब मिटवला तर ही वेळ येणार नाही. त्यामुळे सरकारनं मराठा समाजाचा अंत पाहू नये, असंही मनोज जरांगे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये