ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

विरोध मावळला, तारीख ठरली! परेश रावलचा ‘शास्त्री विरुद्ध शास्त्री’ प्रदर्शित होणारच..

Shastry Virudh Shastry Paresh Rawal hindi movie : प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांचा ‘शास्त्री विरुद्ध शास्त्री’ नावाचा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला होता. आता त्याच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. साउथची अॅक्ट्रेस मिमी चक्रवर्तीची यात महत्वाची भूमिका आहे.

नंदिता रॉय शिबोप्रसाद मुखर्जी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही घोषित केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटावरुन मोठा वादही झाला होता. त्यामुळे त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. परेश रावल यांची या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका आहे. बऱ्याच दिवसांनी परेशजी पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून समोर येत आहेत.

यापूर्वी आयुषमान खुराना, अनन्या पांडे यांच्या ड्रीम गर्ल २ मध्ये देखील परेश रावल यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या परेश रावल यांनी वेगळी ओळख चाहत्यांच्या मनात तयार केली आहे. त्यांच्या शास्त्री विरुद्ध शास्त्री नावाच्या चित्रपटाची चर्चा रंगली होती. त्याबाबत एक मोठी बाब समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये