Gaganyaan Mission: भारताची पुन्हा गगनभरारी; ‘गगनयान’ प्रो मॉड्यूलची चाचणी झाली यशस्वी

Gaganyaan Mission | आज (21 ऑक्टोबर) भारतानं (India) पुन्हा एकदा गगनभरारी घेतली आहे. भारताची ‘गगनयान’ (Gaganyaan) प्रो मॉड्यूलची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे भारतानं पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी करत इतिहास रचला आहे. तर या यशस्वी मोहीमेनंतर इस्त्रोच्या (ISRO) शास्त्रज्ञांचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे.
श्रीहरीकोटा (Sriharikota) येथे इस्त्रोच्या गगनयान मोहिमेअंतर्गत पहिलं चाचणी उड्डाण प्रक्षेपित करण्यात आलं. आज सकाळी दहा वाजता ही उड्डाण चाचणी करण्यात आली. तर या चाचणी दरम्यान मॉड्यूल अतंराळात नेलं जाणार आहे. त्यानंतर हे मॉड्यूल ठारविक उंचीपर्यंत नेऊन ते पुन्हा पृथ्वीवर परत आणत बंगालच्या उपसागरात उतरवलं जाणार आहे.
या उड्डाण चाचणीला इस्त्रोकडून अबॉर्ट टेस्ट असं नाव देण्यात आलं आहे. ही चाचणी आधी होणार होती पण खराब तांत्रिक कारणामुळे आणि खराब हवामानामुळे ती रद्द करण्यात आली होती. पण आता या तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून आज ही चाचणी करण्यात आली. ही चाचणी अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी करण्यात येणार आहे.
इस्त्रो भारताच्या गगनयान मोहिमच्या प्रक्षेपणाच्या दिशेनं क्रू एस्केप सिस्टमचं (CES) पहिलं चाचणी उड्डाण करण्यात आलं आहे. या गगनयान मोहिमेदरम्यान जर रॉकेटमध्ये बिघाड झाला तर अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणारी क्रू एस्केप सिस्टम चाचणी करण्यात आली आहे.