गिरीश महाजनांनी केला मनोज जरांगे पाटलांना फोन; दिलं मोठं आश्वासन, जाणून घ्या नेमकी चर्चा काय झाली?

Girish Mahajan | मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मनोज जरांगेंना फोन करत त्यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी गिरीश महाजन यांनी मनोज जरांगेंना आवाहन देखील केलं आहे.
तुम्ही एक महिना मुदत मागितीली होती. त्यामुळे तुमच्या शब्दाला मान देत आम्ही 1 महिन्याऐवजी 41 दिवस दिले. मग आता काय अडचण आहे? आमचं काय चुकलं असे सवाल मनोज जरांगे पाटलांनी गिरीज महाजनांना केले. तर यावर उपोषण करू नका, आरक्षण 100 टक्के देणार, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
गिरीश महाजनांनी मनोज जरांगेंना फोन करत म्हटलं आहे की, तुम्ही उपोषण मागे घ्या. आपण यावर मार्ग काढू, सरकार मराठा आरक्षणासाठी गंभीर आहे. देऊन टाका, देऊन टाका असं म्हणत आरक्षण देता येणार नाही. कारण आम्हाला असं आरक्षण द्यायचं आहे ज्याला कुणीही चॅलेंज करू शकत नाही. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ द्या, आत्महत्या करू नका, असं आवाहन महाजनांनी मराठा समाजाला केलं आहे.
तर मनोज जरांगे गिरीश महाजनांना म्हणाले की, तुम्ही म्हटलं होतं, मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांमध्ये मागे घेतो. पण अजून एकही गुन्हा मागे घेतलेला नाहीये. तुमच्याकडून जर तेही होत नसेल तर तुम्ही आरक्षण काय देणार. आत्तापर्यंत 15 ते 16 जणांनी आत्महत्या केल्या आहेत, त्याबाबत सरकारला कसलीही सहानभूती नाहीये. तर आत्महत्याग्रस्त कुटुंबाना मदत करण्याचे सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना आदेश द्या, असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे.