ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

Pune News: पुण्यात नो ओला-उबर, नो स्विगी, नो झोमॅटो; ऑनलाईन सेवा ‘या’ कारणांमुळे राहणार बंद

पुणे | Pune News | पुण्यामध्ये (Pune) आज (25 ऑक्टोबर) सर्व ऑनलाईन सेवा (Online Services) बंद राहणार आहेत. यामध्ये मग स्विगी (Swiggy), झोमॅटो (Zomato), ओला-उबर (Ola-Uber) यासारख्या सेवा बंद राहणार आहेत. उबर, झोमॅटो, ओला, स्विगी, अर्बन कंपनी या मोबाईल अॅपसाठी काम करणारे कर्मचारी आज दिवसभर बंद पाळणार आहेत.

उबर, झोमॅटो, ओला, स्विगी, अर्बन या कंपन्यांकडून कामगारांची पिळवणूक होत आहे. ही पिळवणूक थांबवण्यासाठी महाराष्ट्रात गिग कामगार नोंदणी आणि कल्याणकारी कायदा लागू करावा यासाठी हा बंद पाळण्यात आला आहे. या बंदमुळे स्विगी, झोमॅटो, ओला, उबर यांच्या सेवा पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये बंद राहणार आहे. या बंदचे आयोजन इंडियन गिग वर्कर्स फ्रंट या संघटनेतर्फे करण्यात आलं आहे.

तर आज सगळे कर्मचारी आपले प्रश्न मांडण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलयावर जाणार आहेत. या निवेदनामार्फत सर्व कर्मचारी आपल्या मागण्या मांडणार आहेत तसंच आपल्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती देखील करणार आहेत.

कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत?

– प्रतिदिन किमान वेतन मिळावे.

– फोनवर दाखवलेले अंतर आणि प्रत्यक्ष अंतर यामध्ये फरक नसावा

– डिलिव्हरी बॉयवर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी ग्राहकाच्या तक्रारीची आधी पडताळणी करावी.

– पिक-अप चार्जेस, नाईट चार्जेस, वेटिंग चार्जेस पूर्वीप्रमाणे असावेत.

– सामान्य कॅब चालकांच्या दैनंदिन व्यवसायाच एव्हरेस्ट फ्लीट कंपन्यांनी अडथळा निर्माण करू नये.

– वाहनचालकावर दंड आकारणे किंवा कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रवाशांच्या तक्रारीची आधी पडताळणी करावी.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये