ताज्या बातम्यामुंबई

भिवंडीत अडीच महिन्यांत ८०० कोटींचे ड्रग्ज जप्त

भिवंडीच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक कल्याण नाका परिसरातून एका एमडी ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख पाच हजार रुपये किमतीची ६५ ग्रॅम एमडी पावडर आणि एक मोबाईल जप्त केला आहे.

शहरात मागील १८ दिवसांत एमडी पावडरसह अटक होण्याची ही दुसरी घटना आहे. आतापर्यंत येथे ८०० कोटी ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचबरोबर मेफेड्रोन पावडरसह सहा आरोपींना अटक केल्याने भिवंडी हे कामगारबहुल शहर ड्रग्ज माफियांचा अड्डा बनल्याची टीका होत आहे.

ऑगस्ट महिन्यातही गुजरातच्या दहशतवादी पथकाने दहशतवादविरोधी पथकाने छापा टाकून तब्बल ८०० किलोचे लिक्विड मेफेड्रोन जप्त केले होते. या कारवाई चार जणांना अटक करण्यात आली होती. १८ जुलै रोजी गुजरातेतील पलसाणा येथून तिघांना अटक करत त्यांच्याकडून ५१ कोटींचा कच्चा माल हस्तगत केला होता. त्यांच्याकडून शेख बंधूंची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. भरुचमधील कारवाईत दोघांना एटीएसने अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये