ताज्या बातम्यादेश - विदेश

PM मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, दिल्लीत परतण्यास उशीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेऊन दिल्लीला जाणाऱ्या विमानात झारखंडमधील देवघर विमानतळावर तांत्रिक बिघाड झाला. यामुळे त्यांना दिल्लीत परतण्यास उशीर झाला, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. पीएम मोदी प्रचार झारखंडमधील प्रचारसभा आटोपून दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचल्यानंतर ही घटना घडली.

सुरक्षेबाबत खबरदारी म्हणून तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी सदर विमान लँड करण्यात आले आहे. आदिवासी गौरव दिन आणि बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने आज पीए मोदी यांनी बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली. दरम्यान, आज आज पंतप्रधानांनी झारखंडमध्ये दोन प्रचारसभांना संबोधित केले. झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात ३८ जागांवर मतदान होणार असून त्यासाठी ५२८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला देवघरमधूनच टेक ऑफची परवानगी मिळाली नाही. राहुल गांधी झारखंडमधील गोड्डामधील प्रचारसभेनंतर दिल्लीमध्ये परतणार होते. पण एअर ट्रॅफिक कंट्रोलनं (ATC) गोड्डा ते बेलबड्डामध्ये उड्डाण देण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे राहुल गांधी यांना देवघर विमानतळावर 45 मिनिटं थांबावं लागलं. या काळात राहुलगृ गांधी हेलिकॉप्टरमध्येच बसून होते आणि मोबाईल पाहात होते. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये