पंजाबमध्ये आप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

पंजाबमध्ये आज (दि.२०) चार विधानसभा मतदारसंघ गिद्दरबाहा, डेरा बाबा नानक, चब्बेवाल आणि बर्नाला पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. पहिल्या दोन तासांत आठ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. दरम्यान, डेरा बाबा नानक मतदारसंघातील मतदानावेळी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.
आप-काँग्रेस एकमेकांवर गंभीर आरोप
डेरा बाबा नानक मतदारसंघातील मतदानावेळी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.डेरा बाबा नानक मतदारसंघातील डेरा पठाण गावात ही घटना घडली. या संपूर्ण घटनेचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. काँग्रेसचे खासदार सुखजिंदर सिंग रंधावा आणि आम आदमी पार्टीचे उमेदवार गुरदीप सिंग रंधावा यांनी घटनास्थळी पोहोचून एकमेकांवर गंभीर आरोप केले. घटनास्थळी १०० हून अधिक पोलीस तैनात केले.