अविश्वास प्रस्तावावर जगदीप धनखड यांची संतप्त प्रतिक्रिया,म्हणाले “विरोधकांनी कधीही…”

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि विरोधी पक्षांचे नेते यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. धनख़ड यांना त्यांच्या कार्यकाळातून हटवण्यासाठी विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. यावर खुद्द जगदीप धनखड संतापले असून त्यांनी म्हटले आहे की, ‘विरोधक सोरोसच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी अनावश्यक गोष्टी करत आहेत’.
धनखड म्हणाले की, मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणे ही देशाच्या सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावरून देशाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा डाव आहे. याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे. त्यांनी कधीही खुर्चीचा आदर केला नाही.
केंद्रिय मंत्री जेपी नड्डा यांनी विरोधकांवर निशाणा साधत सर्वांनी याचा निषेध केला पाहिजे असे सांगितले. त्यांनी कधीही सभापतीपदाचा आदर केला नाही. मात्र, गदारोळामुळे सभापतींनी कामकाज 12 डिसेंबरपर्यंत तहकूब केले. गेल्या दोन दिवसांपासून आमचे लोक हा मुद्दा मांडत आहेत की सोरोस आणि काँग्रेसचा काय संबंध?
किंवा सोरोस आणि सोनिया गांधी यांचा संबंध काय? हा देशाच्या अंतर्गत आणि बाह्य प्रश्नांचा प्रश्न आहे. हे आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरही प्रश्नचिन्ह आहे. दोघांच्या नात्यावर चर्चा व्हायला हवी. आम्ही सर्वसामान्यांसाठी बांधील आहोत. हा विषय मी दोन दिवस ठेवतोय. यावर चर्चा व्हायला हवी हे आमचे लोकही मान्य करतात.