आरोग्यइतरताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्र

नागपूरमध्ये आढळले एचएमपीव्हीचे दोन रुग्ण

बंगळुरु, चेन्नई आणि तामिळनाडूनंतर आता नागपूरमध्ये एचएमपीव्हीचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे.  सात वर्षीय मुलगा आणि १४ वर्षीय मुलीला विषाणूची लागण झाली आहे. ३ जानेवारी रोजी त्यांना एचएमपीव्हीची लागण झाल्याचं निदान झालं होतं.  दोघांनाही खोकला आणि तापासारखी लक्षणं दिसत होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कोणतीही गंभीर लक्षणं नसल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं नव्हतं. दरम्यान, आता त्यांची प्रकृती बरी असल्याची माहिती आहे. खाजगी रुग्णालयात केलेल्या चाचणी दोन्ही मुलांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यानंतर आता शासकीय लॅबमधून त्यांची जीनोम सिक्वेन्सींग केली जाईल, अशी माहिती आहे.  नागपूरमध्ये दोन रुग्ण आढळल्यानंतर राज्य आरोग्य सेवा संचालनांकडून नागरिकांनी कोणती काळजी द्यावी यासंदर्भातील सूचना जारी करण्यात आल्या आहेत. खोकला किंवा शिंका येत असेल, तेव्हा तोंड आणि नाक रुमाल किंवा टिशू पेपरने झाका, साबण आणि पाणी किंवा अल्कोहोलिक आधारित सॅनिटायझरने आपले हात स्वच्छ धुवा, ताप खोकला शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा, भरपूर पाणी प्या, पौष्टिक अन्न खा, संक्रमण कमी करण्यासाठी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या, असं परिपत्रकात म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये