इतरक्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईसिटी अपडेट्स

संतापजनक! मुंबईमध्ये 20 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार

मुंबई | Mumbai Crime – मुंबई पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेनं (Rape Case) हादरली आहे. एका 20 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार (Rape Case) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसंच बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील वरळी (Worli Crime News) परिसरात ही संतापजनक घटना घडली आहे. चिमुकलीच्या आईनं वरळी पोलीस स्थानकात (Worli Police Station) तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुंबईतील (Mumbai Crime) वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 20 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 35 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 376 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.”

आरोपी आणि पीडित मुलगी दोघेही एकाच परिसरातील रहिवासी आहेत. मुलीची आई काही वेळासाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी आरोपीनं मुलीला आपल्या घरी नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलगी घरी आल्यानंतर खूप रडत होती, त्यामुळे आईला संशय आला. त्यानंतर आई तात्काळ मुलीला घेऊन जवळच्या रूग्णालात पोहोचली, तेव्हा डॉक्टरांनी चिमुकलीवर बलात्कार झाल्याचं सांगितलं. मग पीडित मुलीच्या आईनं पोलीस स्थानक गाठलं आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तसंच पोलिसांनी तातडीनं कारवाई करत सदर आरोपीला अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये