ताज्या बातम्यामनोरंजन

दिग्दर्शक महेश मांजरेकरांविरोधात गुन्हा दाखल, वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई | Mahesh Manjrekar – दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटावरून वाद सुरू असल्यानं महेश मांजरेकर अडचणीत आले होते. तर आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणी कोर्टानं पोलिसांना मांजरेकरांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एका अपघातात एका आश्रमशाळेच्या संस्थाचालकाविरोधात अर्वाच्च वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश मांजरेकर यांच्या गाडीचा पुणे-सोलापूर महामार्गावरअपघात झाला होता. तसंच ज्या गाडीसोबत अपघात झाला ती गाडी एका आश्रमशाळेच्या संस्थाचालकांची होती. मांजरेकरांवर संस्थाचालकांविरोधात बदनामी करणारं वक्तव्य केल्याचा आरोप आहे. याबाबत त्यांच्याविरोधात टेभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पंढरपूरच्या माढा न्यायालयानं टेभुर्णी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

महेश मांजरेकर आणि टेंभुर्णीतील संत रोहिदास आश्रमशाळेचे संस्थापक कैलास सातपुते यांच्या वाहनांमध्ये पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ अपघात झाला होता. हा अपघात मागील वर्षी 2021 साली झाला होता. त्यावेळी मांजरेकर यांनी बदमानी करणारं वक्तव्य केल्याचा आरोप सातपुते यांनी केला होता. मांजरेकरांनी सातपुते यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य करून प्रतिमा मलिन केल्याची फिर्याद माढा कोर्टात दिली होती. फिर्यादीची दखल घेत न्यायाधीश गांधी यांनी टेंभुर्णी पोलिसांना मांजरेकर यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये