अर्थताज्या बातम्या

विराट कोहलीची गुंतवणूक असलेली कंपनी घेऊन येणार IPO

मुंबई |- Virat Kohli | तुम्ही शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक (Investment) करत असाल आणि आयपीओमध्येही (IPO) पैसे गुंतवून मोठी कमाई करायची असेल असेल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. भारतीय संघाचा क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) यानं ज्या कंपनीत गुंतवणुक केली आहे ती कंपनी आपला आयपीओ घेऊन येणार आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची या कंपनीत गुंतवणूक आहे. तसंच विराट केवळ या कंपनीचा गुंतवणूकदार नसून तो या कंपनीचा ब्रॅंड अँबेसेडर (Brand Ambessedor) देखील आहे. आयपीओ घेऊन येणाऱ्या या कंपनीचं नाव डिजिट इन्शुरन्स असं आहे. डिजिट इन्शुरन्स (Digit Insurance) ही कंपनी ४.५ ते ५ बिलियनच्या मूल्यांकनाने सुमारे ५०० बिलियन डॅालर्स उभारण्याचा विचार करत आहे. तसेच सप्टेंबरपर्यंत ही कंपनी बाजार नियामक सेबीकडे एक मसुदा IPO दस्तऐवज दाखल करण्याची योजना आखत आहे. त्याचबरोबर जानेवारीपर्यंत कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्याही विचारात आहे.

नियमांनुसार, विमा कंपनीला सूचीबद्ध होण्यापूर्वी या क्षेत्रातील किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. डिजिटची पाच वर्षे सप्टेंबरपर्यंत होत आहेत. तसेच माहितीनुसार डिजिटने आपल्या सर्वात मोठ्या शेअरहोल्डर फेअरफॅक्ससह नवीन शेअर्स ऑफर करून निधी उभारण्याची घोषणा केली आहे. यात सुमारे ३० टक्के स्टेक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये