क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक ! शुल्लक कारणावरून मुलीच्या बापाने उचलले टोकाचे पाऊल आणि झाला फरार

उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शुल्लक कारणावरून एका बपाने आपल्या मुलीची हत्या केल्याची घटनाघडली आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरात मुलगी उपस्थित असताना कुत्र्याने मटन खाल्ल्याने घरात वाद निर्माण झाला. दरम्यान, या २२ वर्षीय मुलीला तिच्या आई बापाने शिवीगाळ केली. संतप्त बापाने आपल्याकडच्या गावठी काडतुसाने मुलीवर गोळी झाडली. घटनेनंतर निर्दयी बाप गणेश भोसले फरार झाला. पोलीस त्याचा तपास करत आहेत. दरम्यान, मुलीची आई मीराबाई भोसले हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुलीवर गोळी झाडल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला तुळजापूर मधील एका रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला उस्मानाबादला घेऊन जाण्यात येत होते. दरम्यान, वाटेतच तिचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये