“क्या फेंकता है…”, वीरेंद्र सेहवागने दिल्या नीरज चोप्राला खास शुभेच्छा!

मुंबई | Virender Sehwag Gave Special Wishes To Neeraj Chopra – भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) आभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्याने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद (Athletics Championship) स्पर्धेत रौप्यपदकाची (Silver Medal) कमाई केली आहे. नीरज चोप्राने 88.13 मीटर भालाफेक करत रौप्यपदक आपल्या नावावर केलं आहे. त्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. यामध्ये आता भारताचा दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) “क्या फेंकता है..” असं म्हणत ऐतिहासीक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राला खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.
वीरेंद्र सेहवागने ट्विट करत नीरजला खास शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आजपासून काही वर्षांनी तरुणांची एक पिढी येणार आहे ज्यांच्यासाठी “क्या फेंकता है” ही एक मोठी प्रशंसा ठरणार आहे, या चॅम्पियन नीरज चोप्राचे आभार. पुन्हा एकदा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकासह भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी,’ असं ट्विट वीरेंद्र सेहवागने केलं आहे.
दरम्यान, युजीनमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर अंतरावर भाला फेकत अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं होतं. दरम्यान, रविवारी पार पडलेल्या अंतिम फेरीत चौथ्या प्रयत्नात नीरज चोप्राने 88.13 मीटर अंतरावर भाला फेकला आणि रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं.