ताज्या बातम्यामनोरंजन

चित्रपट, वेब सीरिज नाही तर ‘या’ रिअॅलिटी शो’नी तरूणाईला घातलीये भुरळ

सध्या चित्रपट, वेब सीरिज हे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. तसंच प्रेक्षकही याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देताना दिसत आहेत. पण वेब सीरिज, चित्रपटांसोबतच काही असे रिअॅलिटी शो (Reality Show) आहेत ज्यांनी आजच्या तरूणाईला चांगलीच भुरळ घातली आहे. हे रिअॅलिटी शो पाहण्यासाठी तरूणाई नेहमी आतूर असते. मग बिग बॉस असो किंवा रोडीज असो अशा रिअॅलिटी शोला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देताना दिसत आहेत. तर आता आपण काही अशा रिअॅलिटी शोबाबत जाणून घेणार आहोत ज्याची क्रेझ तरूणाईमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

1. बिग बॉस (Bigg Boss) – ‘बिग बॉस’ हा असा रिअॅलिटी शो आहे ज्यानं प्रेक्षकांना अगदी वेड लावलं. या शोचा प्रत्येक सिझन पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी आतुर असतात. त्यात सलमान खान असल्यामुळे या शोला चार चाँद लागले असं म्हणायला हरकत नाही. बिग बॉस या शोने अनेक कलाकारांना प्रसिद्धीझोतात आणलं आहे. यामध्ये मग शहनाज गिल, एल्विश यादव, प्रतिक सेहजपाल, शिव ठाकरे, सिद्धार्थ शुक्ला असे अनेक कलाकार चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. या शोचे चाहते लाखोंच्या संख्येत आहेत. तसंच सोशल मीडियावर या शोची नेहमीच चर्चा सुरू असते, त्यामुळे तरूणाईमध्ये या शोची चांगलीच क्रेझ आहे.

image 2 4

2. खतरों के खिलाडी (Khatron Ke Khiladi) – रोहित शेट्टीचा ‘खतरों के खिलाडी’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमधील वेगवेगळे स्टंट पाहायला प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडताना दिसत आहे. या शोचा प्रत्येक सिझन गाजला आहे. तसंच बिग बॉस प्रमाणेच या शोने देखील अनेक कलाकारांना प्रसिद्धीझोतात आणलं आहे. खतरों के खिलाडी हा एक स्टंट शो असून यातील वेगवेगळे खतरनाक स्टंट पाहून प्रेक्षक नेहमी चकीत होत असतात. त्यामुळे या शोला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

image 2 5

3. रोडीज (Roadies) – ‘रोडीज’ या शोने आजच्या तरूणाईला चांगलंच वेड लावलं आहे. हा एक बहुचर्चित असा शो आहे. या शोमध्ये जाण्यासाठी तरूणाई वर्षानुवर्षे वाट पाहत असते. रोडीजने अनेक तरूण-तरूणींना प्रसिद्धीझोतात आणलं आहे. या शोची सोशल मीडियावर नेहमी चर्चा सुरू असते. रोडीजचं प्रत्येक पर्व मोठ्या प्रमाणात गाजलं आहे. हा एक साहसी आणि थरार असलेला शो आहे, ज्याची तरूणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. एमटीव्हीवरील हा शो चांगलाच प्रसिद्ध आहे.

image 2 6

4. स्प्लिट्सव्हिला (Splitsvilla) – ‘स्प्लिट्सव्हिला’ हा एक लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. या शोची प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. हा एक कपलसाठी असलेला रिअॅलिटी शो आहे. एमटीव्हीवरील या शोनं अनेकजणांना प्रसिद्धीझातात आणलं आहे. सनी लिओनी आणि अर्जुन बिजलानी हे या शोचे होस्ट आहेत. या शोलाही प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. स्प्लिट्सव्हिला या शोमधील कंटेस्टंट आज सोशल मीडियावर फेमस झाले असून त्यांच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

image 2 7

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये