ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

कोण खरं कोण खोटं? ठाकरे-फडणवीसांनी प्रकल्पाचे सादर केले पुरावे

मुंबई : (Aaditya Thackeray On Devendra Fadnavis) शिंदे-फडणवीस सरकार 4 महिन्याच्या कार्यकाळात चार ते पाच मेगा प्रकल्प बाहेर गेल्यानंतर राज्यातील सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना खडबडून जाग आली असून आता आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झालीये. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन वेदांता-फोक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क, टाटा एअरबस आणि सॅफ्रॉन हे प्रकल्प राज्याबाहेर जाण्यामागे तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कसं जबाबदार आहे यासंदर्भात थेट पुरावे सादर केले आहेत. तत्कालीन सरकारच्या हलगर्जीपणामुळे हे प्रकल्प बाहेर गेले, कोणत्याही प्रकल्पाला पाठपुरावा केला नाही असे आरोप फडणवीसांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

तर विरोधी बाकावर बसलेले आदित्य ठाकरेंनीही तोडीची पत्रकार परिषद घेऊन भाजप कसे आपल्या अपयशाचं खापर महाविकास आघाडीवर फोडतंय हे स्पष्ट करून दाखवलंय. पाठपुरावा केला नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना ठाकरेंनी थेट पाठपुराव्याची टाईमलाईन सांगूनच प्रत्युत्तर दिलंय. तर फडणवीस-शिंदे सरकार आल्यानंतरही वेदांताच्या अधिकाऱ्यांना भेटणारे फडणवीस मविआला कसं वेड्यात काढतात यावर स्पष्टीकरण दिलंय.

दोघांकडूनही पुरावे सादर केले गेलेत पण आता यामध्ये कोण खरं आणि कोण खोटं याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर या प्रकरणावर दोघे समोरासमोर येऊन पोलखोल करणार का याबद्दल शंका आहे. मात्र. या राजकारणामुळे राज्यातील 2 लाख कोटींंची गुंतवणूक आणि 3 लाख रोजगार राज्याबाहेर गेला हि वस्तूस्थिती आहे. यासाठी कोण जबाबदार आहे, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये