ताज्या बातम्यादेश - विदेश
दिल्ली विधानसभा निवडणूक; ‘आप’चा स्वबळावर लढण्याचा निर्धार
दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीची चर्चा मागच्या काही दिवसांपासून होती. आता या सर्व चर्चाना खुद्द आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पूर्णविराम लावला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, “आम आदमी पक्षाने या वृत्तांचे खंडन केले आहे. दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये युती होणार नाही, असे आपने म्हटले आहे.
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार,”दिल्लीत आप स्वबळावर निवडणूक लढवणार. काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारची युती होण्याची शक्यता नाही.”असे त्यांनी म्हटले आहे.