पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचं आमिर खाननं केलं कौतुक; म्हणाला, “अशा संवादातून…”
मुंबई | Aamir Khan – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधत असतात. ते रेडिओच्या माध्यमातून ‘मन की बात’मधून विविध विषयांवर बोलत असतात. तसंच आता पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमाचं बाॅलिवूड अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan) कौतुक केलं आहे.
आमिर खान म्हणाला की, “‘मन की बात’ हा कार्यक्रम संवादाचा सर्वात चांगला भाग असून त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जनतेशी संवाद साधतात. लोकांशी देशाचा नेता संवाद साधतो, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतो, सूचना देतो, नेतृत्त्व करतो. त्यामुळे हा संवादाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे.”
“या संवादातून तुम्ही देशाचं नेतृत्त्व करता. तुम्ही भविष्य कसे पाहता यामध्ये लोकांचा पाठिंबा तुम्हाला कसा हवा आहे, याबाबत ते सविस्तर बोलतात. मन की बातच्या माध्यमातून हा अत्यंत महत्त्वाचा संवाद साधला जातो”, असं म्हणत आमिर खाननं पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे.