शिंदे गट आणि भाजपात मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे, मंत्री सत्तारांचं मोठं विधाण

औरंगाबाद : (Abdul Sattar On Eknath Shinde) सध्या शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह कोणाकडं जाणार हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या एक वक्तव्यानं चर्चेचा उधाण आलं आहे.
निवडणुकीतील चिन्ह आणि आपल्या मतदारसंघातील आपली ताकद यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, “मी एकनाथ शिंदेंना सांगितलं की मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईन. कमकुवत माणसाला काहीतरी आधार लागतो. मी कार्यकर्ता आहे आणि जो कार्यकर्ता असतो त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची भीतीच वाटत नाही.
पुढे बोलताना सत्तार म्हणाले, “कार्यकर्ता पद कुणी हिसकावूनही घेऊ शकत नाही. आमदार, खासदार, मंत्रीपद निघून जाईल, आणखी काही पदं असतील ती जातील, पण कार्यकर्ता हे पद कधीही जात नाही. स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे. जो निवडून येईल तो सत्ताधाऱ्यांचा म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच कार्यकर्ता असेल,” असंही सत्तारांनी नमूद केलं.