पुणेशिक्षण

अभंग स्कूलचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

शाळेचा प्रथम वार्षिक अंक ’सृजनदीप’

पिंपरी : श्रीक्षेत्र देहू येथील अभंग इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शाळेच्या प्रथम वार्षिक अंक ‘सृजनदीप’चे प्रकाशन करण्यात आले. शनिवारी (दि. ९) सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी विचारवंत अनंत पद्मनाभन, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार डॉ. विश्वास मोरे, महाराष्ट्र टाईम्सचे वरिष्ठ पत्रकार सुनील लांडगे, देहू वि. का. स. सोसायटीचे चेअरमन अभिमन्यू काळोखे, ज्योतिषतज्ज्ञ दत्तात्रेय अत्रे, वसंतराव झेंडे, देहू देवस्थानचे माजी विश्वस्त रामभाऊ मोरे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. संजय भसे, मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रवी शेटे, संपतराव शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळेच्या नावाप्रमाणेच या शाळेचे विद्यार्थी आपल्या ज्ञानाने संस्थेचा नावलौकिक अभंग करतील, असे मत श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी याप्रसंगी व्यक्त केले. मुलांनो, तुम्ही नेहमी खरे बोला, कोणाला फसवू नका. तसेच शिक्षकांनी नीतीमूल्यांचे संस्कार करून मुलांना घडवावे, असे मनोगत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, विचारवंत अनंत पद्मनाभन यांनी व्यक्त केले.

वर्षभर राबविल्या जाणार्‍या सर्व उपक्रमांची माहिती पालकांना मिळावी, मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजवावी व मुलांनीदेखील लवकर लिहिते व्हावे, या भावनेतून दरवर्षी सृजनदीपची निर्मिती केली जाईल, असे मत संस्थेचे सचिव प्रा. विकास कंद व प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी मांडले. सांस्कृतिक कार्यक्रमात या पिढीला स्वातंत्र्याचे मोल पुन्हा एकदा समजावे, स्वातंत्र्यसंग्राम पुन्हा एकदा माहिती व्हावा, म्हणूनच हा इतिहासजमा झालेला इतिहास अमृतमहोत्सवाच्यानिमित्ताने जिवंत करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यलढ्यातील काही ठळक घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये