कव्हर स्टोरीविश्लेषण

जैववैद्यकीय कचरा उचलण्याच्या दरात तफावत

पिंपरी – चिंचवड शहरात जैववैद्यकीय कचरा उचलण्यासाठी महापालिकेतर्फेें पॉस्को सोल्युशन प्रा. लि.,कडून या संस्थेची नेमणूक केली आहे. मात्र, या संस्थेकडून शहरातील विविध वैद्यकीय सेवा देणार्‍या संस्थांकडून वेगवेगळ्या दराने जैववैद्यकीय कचरा उचलला जात आहे. या सर्व वैद्यकीय आस्थापनांसाठी एकच दर निश्चित करावा, अशी मागणी पुणे जिल्हा खासगी हॉस्पिटल असोसिएशनतर्फे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

पिंपरी ः महापालिका रुग्णालयांकडून किती बेड आहेत, त्यानुसार किती घनकचरा निर्माण होऊ शकतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तीन वर्षाचे महापालिका पैसे देते. त्यामुळे शहरातील हजारो वैद्यकीय आस्थापनांकडून विनाकारण महापालिाका तीन वर्षांचेच पैसे एकदम भरून घेत आहे. शहरातील रुग्णालये, दवाखाने आणि क्लिनिक येथील जैववैद्यकीय कचरा उचलण्यासाठी १०१ ते १०५ रुपये प्रतिकिलो दराने महापालिका पैसे घेते. परंतु, प्रयोगशाळा रक्तपेढी, नेत्रपेढी येथील कचरा पण, ५१ ते ५४ रुपये प्रतिकिलो दराने घेतला जातो.

म्हणजेच रुग्णसेवा देणार्‍या रुग्णालये, दवाखाने आणि क्लिनिककडून दुप्पट दर कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी आकारला जातो. जैववैद्यकीय कचरा एकच असतो. मात्र, दर मात्र वेगवेगळे आकारले जात आहेत, हे योग्य नाही. त्यामुळे सर्वांसाठी एकच आणि योग्य दर ठेवावा, अशी मागणी केली जात आहे. महापालिकेने नियुक्त केलेल्या संस्थेला वैद्यकीय आस्थापना स्वतः बिल देऊ शकतात. तरीदेखील महापालिका हा खटाटोप करीत आहे. तो बंद करणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या इतर संस्थांना जैववैद्यकीय कचरा उचलण्याची परवानगी द्यावी, अशा विविध मागण्या पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व वैद्यकीय, व्यावसायिक, संघटनांकडून महापालिका आयुक्तांकडे केल्या आहेत.

यावेळी डॉ. गणेश भोईर, डॉ. प्रसाद कुबडे, डॉ. महादेव चव्हाण उपस्थित होते. दरम्यान, पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या दुलर्र्क्षामुळे इंद्रायणी नदी गटारगंंगा झाली आहेे. नदीमध्ये कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात रासायनमिश्रित सांडपाणी सोडले जात आहे.

पिंपरी – चिंचवडमधील नद्यांची सद्यःस्थिती
नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी वारंवार निविदा प्रक्रिया राबविण्याात येते. पण, त्यानंतरही परिस्थिती जैसे थे राहत असून, नदीची अक्षरशः गटारगंगा झाल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. जलपर्णी आणि डासांची उत्पत्ती ही नेहमीचीच समस्या झाली आहे. यावर उपाययोजना करण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीची गटारगंगा झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. इंद्रायणीच्याकाठावर व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कंपन्या, उद्योग आणि सोसायट्या निर्माण झाल्या आहेत. त्या उद्योगातून रसायनमिश्रित, मैलामिश्रित पाणी इंद्रायणी नदीत जाऊन इंद्रायणी दूषित झाली आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती वाढली आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परिसरातून पवना व इंद्रायणी नदी वाहते. या नदीला आलेल्या पुरात नदीत ड्रेनेजचे पाणी मिसळू, नये, म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने ड्रेनेजलाइन टाकली आहे. मात्र, ही ड्रेनेजलाइन जागोजागी फुटली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये