Top 5इतरताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रमुंबईविश्लेषणसिटी अपडेट्स

ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांचे निधन…

mumbai : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके (Hari narke) यांचे निधन झाले. एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यावरून मुंबईला एका बैठकीसाठी ते येत असताना सकाळी त्यांना हृदयविकाराच्या झटका बसला. यानंतर त्यांना वांद्रे येथील एशियन हार्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.

हरी नरके हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. तसेच पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. त्यांनी महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन आणि महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा ही पुस्तके लिहिली आहेत. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे, हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.

पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य राहिले आहेत.हरी नरके (Hari narke) हे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. तसेच ओबीसी आरक्षणासंदर्भात विपुल अभ्यास करून त्यासाठी प्रदीर्घ लढाई दिली. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र विविध माध्यमातून समाजासमोर आणले. तसेच पुरोगामी विचारवंत म्हणून ते प्रसिद्ध होते.समतेच्या चळवळीत काम करताना आमच्या असंख्य आठवणी आहेत. दलित-शोषितांच्या प्रश्नांवर त्यांचा विशेष अभ्यास होता. शोषित समुहाचे प्रश्न तडीस नेण्यासाठी ते आग्रही असायचे. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (savitribai phule pune university) नाव देणे तसेच विद्यापीठांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभा करणे यासाठी विशेष प्रयोग त्यांनी केला होता.

सकाळी मुंबईला येत असताना सहा वाजता गाडीत त्यांना दोन वेळा उलट्या झाल्या. त्यानंतर एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती हरी नरके यांचे निकटवर्तीय, जवळचे मित्र मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये