देश - विदेशविश्लेषणशिक्षण

वायुसेनेची सलामी

पंढरपूर हे एक शैक्षणिक हब होण्याकडे गेल्या दशकभरापासून मोठी दमदार वाटचाल झाली आहे. यामध्ये सिंहगड, एमआयटी, स्वेरी, कर्मयोगी अशा अनेक संस्थांचा नाम उल्लेख करावा लागेल. उच्च शिक्षणातील वेगवेगळ्या संधी या पंचक्रोशीमध्ये आणण्यामध्ये अनेक संस्थांचा सिंहाचा वाटा आहे. काल भारतीय वायुसेनेने त्यांच्या अत्याधुनिक व्यवस्थेची माहिती देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना असलेल्या संधी समोर आणण्यासाठी देशाच्या सीमेवरून थेट पंढरपूरकडे कूच केली आणि सिंहगड कॅम्पसमध्ये अफलातून प्रदर्शन आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम केला. सिंहगडच्या नावलौकिकामुळेच आपण या महाविद्यालयाचे निवड केल्याचे स्पष्टपणाने वायुदलाच्या सूत्राने सांगितले. प्रचंड प्रतिसादात पार पडलेल्या या कार्यक्रमातून पंढरपूरकरांनी वायुसेनेला सलामी दिली, परंतु सिंहगडची निवड करून या सेनेने देखील शैक्षणिक गुणवत्तेसाठी सिंहगडला सलामी दिल्याचे बोलले जाते.

भारतीयांना कायमच सैन्य दलातील अंतर्गत घडामोडी बाबत, त्यांच्या राहणीमानाबद्दल, त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि कार्यावलोकना बद्दल कमालीची उत्सुकता असते. आभाळातून जाणारे एखादे जेट विमान जरी दिसले तरी मोठ्या उत्सुकतेने आकाशाकडे डोळे लावून बघणारे आपण लोक आहोत. एक वेळेस सामान्य नागरिक वाहतुकीचे विमान आपण पाहणार नाही परंतु अनेकदा पाहिले तरी देखील वायुसेनेचे मोठ्या वेगाने जाणारे जेट पाहण्यासाठी लहानांची नव्हे तर मोठ्यांची देखील उत्सुकता असते. या सेनेमधील करियर, ड्रेस, युनिफॉर्म, त्यांची वागणूक, त्यांचा अतिव संघर्ष या सगळ्यांबद्दलच आपल्याला कायमचे उत्सुकता असते. परंतु हे सर्व काही सीमेवर असल्यामुळे रोजच्या दैनंदिन घडामोडी मध्ये आपल्याला या या वायुसेनेतील यंत्रणांची माहिती कधीच होत नाही. या क्षेत्रामधील करिअरच्या वेग वेगळ्या संधी, तेथील शिक्षण, तेथील व्यावसायिकता याबाबत देखील कमालीची उत्सुकता असते.

काल पंढरपूर सारख्या ग्रामीण- अर्ध शहरी मानल्या जाणाऱ्या एका विकसनशील तालुक्यातील सिंहगडच्या कॅम्पस मध्ये थेट वायुदलाची ही यंत्रणा अवतरली. मोठी व्हॅन, त्यांचे अनेकविध सुसज्ज असे सामग्री, वेगवेगळ्या गाड्या, त्यातून वायुसेनेचे स्टाफ आणि त्यांच्या लहानसहान बाबींपासून ते अवकाशात भरारी मारणाऱ्या करिअरपर्यंत सर्वकाही संधीची नीसंधीग्ध माहिती या वायुसेनेच्या या शिबिरामधून देण्यात आली. त्यांनी मुद्दामच सिंहगडची निवड केली हे आवर्जून सांगितले. येथे कुठलाही वशिला किंवा शिफारस चालत नाही. तालुकास्तरीय शिक्षण संस्थांमध्ये सर्वात गुणवत्ता प्रधान, व्यवस्थित आणि नावलौकिक असलेली संस्था त्यांना निवडायची होती. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामधून सिंहगड पंढरपूर कॅम्पस निवड केली गेली. हे देखील अभिमानास्पद आहे.

आपल्याला असे वाटते की वायुसेनेतील नोकरी म्हणजे विमान चालविणे किंवा विमानातून बॉम्ब च मारा करणे, पहाडी इलाक्यामध्ये कर्तव्य बजावणे वगैरे वगैरे…. अशा काही ठळक गोष्टी आपल्यासमोर असतात. परंतु अगदी व्हॅनिटी व्हॅन स्वच्छ करण्यापासून ते कमांडिंग अटेंडन्स पासून तसेच मेडिकल , रेस्टॉरंट , क्लीनिंग, मॅनेजमेंट अशा अनेक विविध स्तरावर वायुसेनेमध्ये प्रचंड नोकरीचे संधी आहेत यातील माहिती देखील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कळत नाही. पंढरपूर सारख्या भागात तर ती कळणे खूपच दुरापास्त आहे. परंतु हजारो हजारो नोकरीच्या संधी या वायुसेनेमध्ये आहेत. त्याच्या जाहिराती निघतात. त्या कशा बघायच्या, तिथे कसे आवेदन करायचे, तेथे काय काय शिकायचे आणि तिथपर्यंत जाण्याकरता कशी तयारी करायची ? अशा सर्व सूक्ष्म बाबींचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि विस्तृतपणाने सादरीकरण या शिबिरामध्ये झाले. दहावीची परीक्षा असताना देखील खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी – विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांनी या शिबिराला प्रतिसाद दिला.

वायुसेनेमध्ये असलेल अवजड यंत्रसामुग्री, त्यांच्या व्यवस्था, तंत्रज्ञान हे जवळून पाहण्याची संधी प्रथमच पंढरपूरच्या पंचक्रोशीतील जनतेला मिळाली. आणि पंढरपूरकर अक्षरशः भारावून गेले. वायुसेनेच्या या शिबिरामुळे अनेकांच्या करिअरची दिशा बदलेल, ती घडेल आणि प्रगतीपथावर जाईल यामध्ये संदेह नाही. शैक्षणिक नावलौकिक मिळवून वायुसेनेचे हे पथक आपल्याकडे खेचून आणणाऱ्या आणि त्यासाठी अविरत परिश्रम घेऊन आपली सिद्धता करणाऱ्या सिंहगडचे अध्यक्ष एम एन नवले, प्रा. डॉ. सुनंदा नवले, पंढरपूरचे प्राचार्य कैलास कारंडे, समीर कुलकर्णी आदींचे अभिनंदन आणि पंढरपूरकरांच्या वतीने खूप खूप धन्यवाद.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये