“…असे तयार होतात चविष्ट संजय राऊत”, अभिनेते किरण मानेंची पोस्ट चर्चेत
मुंबई | Kiran Mane’s Post In Discussion – गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यामध्ये आता स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांनी भाष्य केलं आहे. नुकतंच किरण माने यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
किरण माने हे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. नुकतीच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी अनेक राजकीय नेत्यांची नावे घेतली आहेत. तसंच या पोस्टद्वारे त्यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
“साधारणपणे सव्वापाच वाट्या किरीट सोमैय्या, साडेतीन टेबलस्पून चंद्रकांतदादा, अर्धा चमचा उपाध्ये किंवा वाघताई – दोघांपैकी जे हाताशी असेल ते.. वरून चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे.. याचं मिश्रण एकजीव करून खरपूस तळलं की एक चविष्ट ‘संजय राऊत’ तयार होतात !”, अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे. तसंच त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.