ताज्या बातम्यापुणे

पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध ज्वेलर्सवर इन्कम टॅक्सची छापेमारी

पुणे | पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक नीलकंठ ज्वेलर्सवर आज सकाळी प्राप्तीकर विभागाने धाडी टाकल्या. सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील नारायणपेठ येथील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक नीलकंठ ज्वेलर्सवर आज पहाटे पासून प्राप्तीकर विभागाच्या पथकाने छापेमारी सुरू केली आहे. पुण्यातील हडपसर, पत्र्या मारुती चौक, बाणेर परिसरात ही छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईत काही कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे.

शहरात निळकंठ ज्वेलर्सच्या दहा शाखा आहेत. या सर्व शाखांवर आयकर विभागाने तपासणी सुरु केली आहे. तसेच शोरुमच्या संचालकाच्या निवासस्थानीही पथक पोहचले आहे. आयकर विभागाच्या पथकाची विभागनी चार टीममध्ये करण्यात आली असून त्यांनी एकाच वेळी विविध ठिकाणी तपासणी सुरु केली आहे. पुणे शहरात निळकंठ ज्वेलर्सवर ही छापेमारी का सुरु आहे? याचे कारण अद्याप समोर आले नाही. परंतु ही तपासणी दिवसभर किंवा त्यानंतरही चालणार असल्याची शक्यता आहे. आयकर विभागाच्या 40 वाहनातून आलेले 50 पेक्षा जास्त अधिकारी तपासणी करत आहेत.

गुरुवारी सकाळी 40 वाहनांमधून आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी तपासणी सुरु केली. या तपासणीसत्राची बातमी शहरात पोहचली अन् त्याची चर्चा सुरु झाली आहे. पुणे शहरातील हडपसर, मगरपट्टा, बाणेर या भागांत ही छापेमारी सुरु आहे. आयकर विभागाचा मोठा फौजफाटा तपासणीसाठी आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये