ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

वय वर्ष अवघं 20; मिलियन्समध्ये फॉलोअर्स, ‘थांबायचं नाय’ म्हणत अभिनेत्री तुनिशाने संपवलं जीवन…

नायगाव : (Actor Tunisha Sharma Death) एका मालिकेचे शूटिंग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन अभिनेत्री टुनिशा शर्माने आत्महत्या करत आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. नायगाव येथील स्टुडिओतील सेटवर ही घटना घडली आहे. टुनिशाने आपल्या इन्स्टाग्रामवर ही स्टोरी शेअर केली आहे.

सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या मालिकेचं शूटिंग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्येच तिने गळफास घेतला. घटनेनंतर तात्काळ तिला रूग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. टुनिशाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

अवघ्या 14 व्या वर्षी तिची भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप या मालिकेसाठी निवड झाली होती. या मालिकेत तिने राजकुमारी चंद कंवरची भूमिका केली होती. त्याच वर्षी तिने चक्रवर्ती अशोक सम्राट या टीव्ही मालिकेत राजकुमारी अहंकाराची भूमिकाही साकारली होती. त्यानंतर तिने गब्बर पूंछवाला आणि शेर-ए-पंजाब: महाराजा रणजीत सिंग या चित्रपटात भूमिका केल्या.

पर्यंत तिने फितूर, बार बार देखो, कहानी 2, दुर्गा रानी सिंह आणि दबंग 3 सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. टुनिशाने पाच वर्षापूर्वी आलेल्या ‘फितूर’ चित्रपटात छोट्या कतरिनाची भूमिका साकारली होती. अवघ्या कमी वयात इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केलेल्या टुनिशाने असे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये