बिग बॉसमुळे बदलले ‘या’ कलाकारांचे आयुष्य, आता गाजवत आहेत प्रेक्षकांच्या मनावर राज्य
बिग बॉस (Bigg Boss) हा असा रिएॅलिटी शो आहे ज्यामुळे अनेक कलाकारांचं आयुष्य बदलंल आहे. हा शो सर्वात लोकप्रिय असा शो आहे. स्पर्धकांमधील भांडण, मैत्री, मस्ती, प्रेम अशा अनेक गोष्टींनी भरलेलं हे बिग बॉसचं घर प्रेक्षकांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस पडताना दिसत आहे. फक्त बिग बॉसच्या घरातील स्पर्धकच नाही तर हा शो होस्ट करणाऱ्या सलमान खानमुळे देखील हा शो चांगलाच चर्चेत असतो. या शोने अनेक स्पर्धकांना स्टारडम दिले आहे. तर आता आपण काही अशा सेलिब्रिटींबाबत जाणून घेणार आहोत ज्यांचं बिग बॉसमुळे आयुष्य बदललं असून आज ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
1. सनी लिओनी (Sunny Leone) – सनी लिओनी ही बोल्ड आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. पूर्वी तिला फक्त अॅडल्ट स्टार म्हणून ओळखलं जायचं. पण तिनं बिग बॉसमध्ये पदार्पण केल्यानंतर ती बॉलिवूडचा एक भाग बनली. बिग बॉसमुळे सनी लिओनीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तिला या शोनंतर महेश भट्ट यांनी चित्रपटाची ऑफर दिली होती. त्यानंतर ती बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.
2. नोरा फतेही (Nora Fatehi) – नोरा फतेही ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आयटम साँग करताना दिसली आहे. नोराचा चाहता वर्गही मोठ्या संख्येत आहे. पण नोराला ही प्रसिद्धी बिग बॉसमुळेच मिळाली आहे. नोरा बिग बॉसच्या घराचा भाग बनली आणि त्यानंतर ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. आज ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतेय.
3. शहनाज कौर गिल (Shahnaz Kaur Gill) – शहनाज कौर गिल ही बिग बॉसमुळे चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. बिग बॉसच्या तेराव्या पर्वात शहनाजनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. त्यामुळे ती प्रेक्षकांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरली. आज तिचा चाहता वर्ग लाखोंच्या संख्येत आहे. तसंच बिग बॉसमुळे शहनाज एवढी फेमस झाली की ज्या लोकांनी बिग बॉस पाहीलं नव्हतं ते लोकंही तिला ओळखत आहेत. विशेष म्हणजे शहनाजनं आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकली आहे.
4. विकास गुप्ता (Vikas Gupta) – विकास गुप्ता हा इंडस्ट्रीत काम करत होता पण तो जास्त प्रसिद्धीझोतात नव्हता. पण जेव्हा तो बिग बॉसमध्ये आला तेव्हा त्याला खरी ओळख मिळाली. बिग बॉसच्या 11व्या सीझननंतर तो चांगलाच प्रसिद्धीझोतात आला. विशेष म्हणजे तो अकराव्या सीझनमध्येच नाही तर तो बिग बॉसच्या 14व्या सीझनमध्येही सहभागी झाला होता. आता त्याला मास्टरमाइंड म्हणून देखील ओळखलं जातं. सोशल मीडियावर तो नेहमीच चर्चेत असतो.
5. प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal) – प्रतीक सहजपाल हा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. त्याचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. प्रतीकनं अनेक रिअॅलिटी शो केले आहेत पण त्याला खरी ओळख बिग बॉसमुळे मिळाली. बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये प्रतीक आला होता त्यानंतर तो चांगलाच प्रसिद्धीझोतात आला.