Breaking News : अभिनेत्री राखी सावंतला अटक, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या
मुंबई | Rakhi Sawant Arrested – अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi Sawant) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. राखी सावंतनं (Rakhi Sawant) एका माॅडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली आहे. राखीनं एका माॅडेलचा फोटो व्हायरल केला होता. त्यामुळे संबंधित माॅडेलनं पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
यासंदर्भात अभिनेत्री शर्लिन चोप्रानं (Sherlyn Chopra) ट्विटरवर माहिती दिली आहे. ‘आंबोली पोलिसांनी राखी सावंतला 833/2022 क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली आहे. यासंदर्भात काल राखी सावंतनं अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळला आहे’, अशी माहिती शर्लिन चोप्रानं ट्विटमध्ये दिली आहे.
दरम्यान, थोड्या वेळात राखी सावंतला (Rakhi Sawant) न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्यानंतर तिला पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात येणार, याबाबत चित्र स्पष्ट होईल.