तुनिषानंतर आता ‘या’ अभिनेत्रीचा मृत्यू, गोळ्या झाडून केली हत्या

मुंबई | प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तसंच आता पुन्हा एकदा धक्कादायक हत्याकांड समोर आलं आहे. तुनिषानंतर आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. या अभिनेत्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
अभिनेत्री रिया कुमारीची (Riya Kumari) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. रिया कुमारी ही मुळची झारखंडची आहे. तसंच तिचा चाहता वर्गही मोठा आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मात्र, आता तिच्या हत्येनंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
रिया कुमारी तिचा पती प्रकाश कुमारसोबत प्रवास करत होती. त्यावेळी काही अज्ञातांनी त्यांची कार अडवली आणि त्यांनी रियाच्या पतीकडे पैशांची मागणी केली. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी त्यांच्यातील वाढता वाद पाहून रियानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गुंडांनी तिच्यावर हल्ला केला. त्या गोळीबारात रियाचा जागीच मृत्यू झाला.