नितीन गडकरींना धमकावणाऱ्या आरोपीची नागपूर पोलिसांसमोर डायलाॅगबाजी; म्हणाला, “जाओ पहले फोन…”

नागपूर | Nitin Gadkari – काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयात फोन करत एका व्यक्तीनं धमकी दिली होती. तसंच आता तो धमकी देणारा नागपूर पोलिसांच्या हाती लागला आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना धमकी देणारा हा एक कैदी आहे. तर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. मात्र, त्यानं धमकी का दिली? कोणाच्या सांगण्यावरून दिली? ज्या फोनवरून धमकी दिली तो फोन कुठे आहे? या प्रश्नांची उत्तरं अद्याप पोलिसांना मिळालेली नाहीत. अशातच या धमकी देणाऱ्या आरोपीनं पोलिसांसमोर डायलाॅगबाजी सुरू केली आहे. “जाओ पहेल फोन ढूंढके लाओ”, असा डाॅयलाॅग त्यानं मारल्याची माहिती समोर आली आहे.
नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना कर्नाटकच्या बेळगाव कारागृहात असलेल्या कुख्यात गुंड जयेश कांथा यानं धमकी दिली होती. जयेश कांथानं तुरुंगातून फोन करून गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. पण त्यानं ज्या मोबाईलवरून फोन केला तो फोन मात्र सापडत नाहीये. त्यामुळे पोलिसांनी त्याला अनेक अंगाने प्रश्न केले. पण तो पोलिसांना काही ताकासतूर लागू देत नाहीये. त्यामुळे नेमकं करावं तरी काय? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
तसंच जाओ पहले फोन ढूंढके लाओ, अशी डायलॉगबाजी हा आरोपी करत आहे. तुम्ही जो मोबाईल माझा आहे असं सांगत आहात आधी तो मोबाईल शोधा. तसंच त्यातील सीम कार्डही शोधा, असं आव्हानच या कैद्यानं पोलिसांना दिलं आहे. दरम्यान, तुरुंग प्रशासनाचा बदला घेण्याच्या सूडभावनेतूनच नितीन गडकरींना फोन केल्याचं या कैद्यानं म्हटल्याचं सांगितलं जात आहे.